शेअर मार्केट म्हणजे काय ?

शेअर मार्केट म्हणजे काय ?

शेअर मार्केट हा आसा बाजार आहे. जिथे कंपन्यांचे शेअर खरेदी विक्री करता येतात. मग शेअर म्हणजे नक्की काय? एक साध उदाहरण  घेऊन समजून घेऊया. समजा तुम्ही एक किराणा दुकान सुरु केलत बिसिनेस सुरु होऊन वर्ष पूर्ण झालीत आणि दुकान मस्त चालत आहे . पण आता तुम्हाला हा बिसिनेस आता मोठा करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला हवाय मोठा पैसा. पण बँक मध्ये लोण घ्यायला गेलात तर खूप सारा व्याज लागतेय मंग करायच काय? मंग आता तुम्हाला पैसा कोण देणार?

त्यासाठी आता तुम्ही शेअर  बाजाराची मदत घेऊ शकता म्हणजे आता नक्कीच करायच  काय आहे ? तर तुम्ही आता भारताच्या अख्ख्या पब्लिकला पैसा मांगणार तुमचा बिसिनेस वाढवायला. पण कोणी तुम्हाला पैसा फ्री मध्ये का देणार त्या साठी तुम्हाला पण काही तरी द्यावं लागणार ना? त्यालाच मानतात शेअरम्हणजे काय तर तुम्ही तुमच्या बिसिनेस मधला  काही भाग / थोडासा हिस्सा पब्लिकला देणार आहात आणि त्याना पब्लिकला शेअर होल्डर म्हणतात कारण त्यांचा कडे तुमच्या बिसिनेस  चा भाग असतात. आणि हे शेअर होल्डर एक प्रकारे तुमचे बिसिनेस मालक बनतात पण त्यांनी जितका पैसा तुम्हाला दिला असेल त्याच हिशोबाने त्यांना हक्क मिळतो .अश्याप्रकारे मोठा कंपन्या देखील बिसिनेस साठी पैसा जमा करतात उदाहरणार्थ TATA , WIPRO  ,HDFC  इत्यादी.

( हे शेअर मार्केट चे बेसिक कन्सेप्ट झाले. आता  काही माहिती स्टॉक स्टॉक मार्केट एक्सचेंज बद्दल घेऊया.)

स्टॉक म्हणजे काय ?स्टॉक व शेअर मार्केट मध्ये काय फरक आहे?

जसे पाण्यात पोहायला शिकता पाण्यात उडी मारने रिस्की आहे त्याच  प्रमाणे शेअर मार्केट, स्टॉक मार्केट याचा अभ्यास करता शेअर मार्केट मध्ये काम रिस्की असते. शेअर मार्केट चा अभ्यास करून हि रिस्क कमी करता येते. आता आपण स्टॉक मार्केट ची माहिती घेऊया .

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना स्टॉक शेअर हे दोन शब्द नेहमी कानावर पडतात . आपल्याला हे दोन्ही शब्द एकच असल्याचे वाटते. पण तसे नाही कोणत्याही कम्पनीचे स्टॉक हे त्या कम्पनीची मालकी दर्शविते. जेव्हा पण एखादी कम्पनी शेअर बाजारात पैसा जमा करण्यासाठी  येते तेव्हा हि कंपनी तिचे स्टॉक अगोदर मार्केट  विकते याच स्टोकचे लहान हिस्से म्हणजे शेअर असे म्हणतात.जेव्हा अनेक शेअर एकत्र ठेवले जातात तेव्हा त्यास स्टॉक म्हण

स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?(what is stock exchange )

स्टॉक एक्सचेंज  या नवावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल कि स्टॉक एक्सचेंज निमजे आहे काय.

स्टॉक म्हणजे एखाद्या कंपनीचा शेअर किंवा हिस्सा आणि एक्सचागे म्हणजे देवाण घेवान किंवा खरेदी विक्री .

स्टॉक एक्सचेंज हि एक असा मार्केट  आहे जिथे कंपन्यांचे शेअर खरेदी आणि विक्री केले जातात . ते कंपन्यान साठी शेअर जरी करून भांडवल उभारण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना शेअर खरेदी विक्री करण्या साठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करतात

भारतात मुख्य २ स्टॉक एक्सचेंज आहेत.

)बॉम्बे स्टॉक  एक्सचेंज (BSE -Bombay Stock Exchange )

) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE – National Stock Exchange )

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 

बॉम्बे एक्सचेंज ची स्थापना जुलै १८७५ मध्ये झालेली आहे . हे भारतातील तसेच आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखले  जाते .https://www.bseindia.com हि त्यांची वेबसाइट आहे . जागतिक स्थरावर BSE १० व्या क्रमांकाचा एक्सचेंज आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज 

नॅशनल एक्सचेंज ची स्थापना २७ नोव्हेंबर १९९२ मध्ये मुंबई या ठिकाणी झाली. हे एक्सचेंज भारतातील सगळ्यात मोठे एक्सचेंज म्हणून ओडखळे जाते . NSE मध्ये १९०० पेक्ष्या जास्त कंपन्या लिस्टेड आहेत.https://www.nseindia.com हि त्यांची वेबसाइट आहे. जागतिक स्थरावर NSE ११ व्या क्रमांकाचा एक्सचेंज आहे . नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा बेंचमार्क इंडेक्स nifty50 आहे .ज्यामध्ये भारतातील ५० कंपन्यांचा समावेश आहे.

स्टॉक एक्सचेंज नेमके काय काम करते ?

मोठं मोठया कंपन्या जेव्हा बिसनेस वाढवण्यासाठी पैसा जमा करतात तेव्हा ते त्यांचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट करतात असं केल्याने मी तुम्ही आणि कोणीही हे शेअर्स विकत घेऊ शकतो . सोप्या भाषेत बघायला गेलं ते स्टॉक एक्सचेंज एक असे माध्यम आहे जे इन्व्हेस्टर आणि कांपनीला एकत्र घेऊन येतात.

स्टॉक एक्सचेंज चे फायदे ?

)रोजगार संधी : स्टॉक एक्सचेंज मध्ये निवेश करणे आपल्याला रोजगार संधी प्राप्त करून शकते. जर आपण यशश्वी निवेश केला तर आपल्याला अधिक धनवान बनविण्याची संधी प्राप्त होते.

)बिसिनेस साठी पैसा :स्टॉक एक्सचेंज च्या मदतीने अनेक कंपन्या त्यांचे शेअर पब्लिक ला विकून पैसे गोडा करतात .

) लिक्विडीटी : स्टॉक एक्सचेंजमध्ये निवेश करण्याचे एक आणि महत्वाचे फायदे आहेत कि तो अत्यंत लिक्विड बाजार आहे त्यामुळे आपल्याला आपल्या निवेशाच्या प्रक्रियेला स्वतंत्रता आणि विचार करण्याची संधी मिडते .

)अर्थवेवस्थेची वाढ : प्रत्येक देशाच्या अर्थवेवस्थेच्या प्रगतीसाठी एक्सचेंज एक महत्वाचा भाग आहे . त्यामुळे बिसिनेस वाढवायला पैसा मिळतो त्यामुळे तर आपल्या अनेक लोकांना नोकऱ्या उपलब्ध होतात.

) समाधान: स्टॉक एक्सचेंज मध्ये निवेश केल्याने आपल्याला आपल्या समस्यांचे समाधान करण्याची संधी मिळते.

विविध प्रकारचे शेअर्स:

स्टॉक मार्केट मध्ये शेअर्स दोन श्रेणीमध्ये विभागले गेले आहेत

)इक्विटी शेअर्स 

)प्राधान्य शेअर्स 

इक्विटी शेअर्स 

या शेअर्स मध्ये किंवा सामान्य शेअर्स मध्ये कंपनीद्यारे जाहीर केलेले मोठ्या प्रमाणात शेअर्स असतात .इक्विटी शेअर्स ट्रान्सफर केल्या जाऊ शकतात स्टॉक मार्केट मध्ये निय

मीत पणे ट्रेंड केल्या जाऊ शकतात.

इक्विटी शेअरधारक कंपनीच्या विशिष्ट बाबींवर मतदान हक्कांसाठी पात्र आहेत तसेच लाभांश मिळविण्याचा अधिकार आहे. म्हणजे, कंपनीच्या नफ्याद्वारे ऑफर केलेले लाभांश अचूकपणे निश्चित केलेले नाहीत. इक्विटी शेअरधारक योग्य रिस्कसाठी जबाबदार आहेत आणि स्टॉक मार्केटवर परिणाम करणारे बाजारपेठेतील अस्थिरता आणि इतर घटकांचे परिणाम त्यांच्या एकूण इन्व्हेस्टमेंटच्या आधारावर प्रभावित करतात

प्राधान्य शेअर्स 

प्राधान्य शेअर्स मध्ये आपल्याला कंपनीच्या लाभातील मोठा भाग मिळतो. हे शेअर्स इतर शेअर्स पेक्ष्या अधिक लाभ देतात . त्यालाच आपण पसंतीचा स्टॉक असे सुद्धा मनू शकतो . प्राधान्य स्टॉक मालकाला कंपनीचा संपूर्ण आयुष्यभर कंपनीच्या लाभांशावर विशेष हक्क प्रधान करतात.

कोणीही शेअर्स मार्केट मध्ये शेअर्स खरेदी विक्री करू शकतात का ?

तुम्ही ब्रोकर्स च्या माध्यमातून शेअरमार्केट मध्ये शेअर्स खरेदी विक्री करू शकता . पण त्यासाठी तुम्हाला ब्रोकरसह डिमॅट अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट उघडणे आवश्यक आहे . हे दोन्ही खाते ब्रोकर्स उघडून देत असतात . अकाउंट उघडल्या नंतर तुम्ही स्टॉक मार्केट मध्ये शेअर्स खरेदी विक्री करू शकता.

शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायला किमान किती वय असाव लागत ?

हा प्रश्न तुम्हाला देशील पडला असेल कि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याची वय मर्यादा किती आहे ?याबाबत अनेकांचा संभ्रम असतो मात्र लक्ष्यात घ्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयाची कोणतीही आत नाही .तुम्ही कोणत्याची वयात मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकता . मात्र स्टॉक मार्केट मध्ये गुंवणूक करण्यासाठी डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते असणे महत्वाचे असते .

डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते

पण डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी वयाची मर्यादा असून तुमचे वय १८ वर्ष्या   पेक्षा जास्त असावे .याशिवाय डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी  देखील पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. १८ वर्षांनंतरच्या वयासाठी पॅनकार्ड सहज बनते . पण तरी सुद्धा तुम्हाला कमी वयाचे पॅनकार्ड बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता ते पॅनकार्ड तुम्ही अल्पवयीन  म्हणून बनवू शकता.

१८ वर्षांखालील व्येक्ती गुंतवणूक कसा करू शकेल ?

तुमचे वय १८ वर्षावेक्षा कमी असेल आणि तरीही तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची आहे तर तुम्हाला एका पालकाची कागतपत्र जमा करून डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडता येते. पालकाद्वारे अल्पवयीन  मुलाच्या नावाने ब्रोकरेज मध्ये डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडले जाऊ शकते सर्व आवश्यक कागतपत्रे पड्ताडणी केल्या  नंतर डिपॉझिटरी पार्टीसिपंट तुम्हाला भारतीय स्टॉक एक्सचेंज मध्ये व्यापार करण्याची परवानगी देते

शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यासाठी काही टिप्स :

 शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असल्यास, तुम्हाला खास टिप्स आवश्यक आहेत ज्यामुळे तुम्ही नुकसान कमी करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. चला तर आपण आता काही येथे काही महत्त्वपूर्ण टिप्स बघू यात. 

शिक्षित रहा: शेअर बाजाराच्या मूलभूत गोष्टी समजून घेण्यासाठी वेळ काढा. त्यात ते कसे काम करते, विविध गुंतवणूक पर्याय आणि जोखीम व्यवस्थापन धोरणे यासह.

प्लानिंग करा: तुम्ही शेअर मार्केटमध्ये किती पैसे गुंतवणार आहात आणि किती काळासाठी हे ठरवा. नियोजनाशिवाय पैसे गुंतवू नका .

चांगल्या कंपनी मध्ये पैसे गुंतवा: चांगल्या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करा. कंपनीची चांगली माहिती घेतली पाहिजे.

लाँग टर्म इनवेसमेंट करा: दीर्घकालीन गुंतवणूक (लाँग टर्म इनवेसमेंट) ही सर्वोत्तम मानली जाते. तुमचे पैसे गमावण्याचा धोका कमी होतो.

स्वतःवर नियंत्रण ठेवा: भावनिक होण्याच्या धोक्यांपासून बचवण्यासाठी तुम्ही आपल्याला नियंत्रित ठेवावे

विविध क्षेत्रात गुंतवणूक करा: विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न  करा.अफवांवर विश्वास ठेवू नका: इतरांच्या सल्ल्यां किंवा अफवांच्या वादांकरून गुंतवणूक करण्याची तुमची नवड चुकवू नका.  

आपण काय शिकलो?:

शेअर मार्केट हे एक वित्तीय बाजार आहे ज्यात विभिन्न कंपन्यांचे   शेअर्स (साझा निधी) विनिमय केले जातात. हे मार्केट व्यापाराच्या, निवेशाच्या, आणि अर्थशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. शेअर मार्केटमध्ये विनिमय केलेल्या शेअर्सचे मूल्य बाजाराच्या प्रदर्शनावर आधारित असते , ज्यामुळे बाजाराची स्थिरता आणि चाल समजन्यास मदत होते . शेअर मार्केटमध्ये निवेश करण्याचे फायदे आणि  प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे आणि त्याचे निवेशकांसाठी रिस्क व संभाव्यपरिणामाचे निर्णय करणे महत्त्वाचे आहे. 

(सिक्युरिटीजमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते, गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

 

2 thoughts on “शेअर मार्केट म्हणजे काय ?”

  1. Pingback: IPO   बद्दल माहिती - मार्केट मंथन IPO meaning in Marathi 1

  2. Pingback: स्टॉक मार्केट चे नियम व त्याबद्दल संपूर्ण माहिती - मार्केट मंथन1

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version