Smallcap Mutual Funds :बेस्ट ५ स्मालकॅप फंड जे तुम्हाला देऊ शकतात दमदार परतावा.

Smallcap Mutual Funds

स्मालकॅप कंपन्या ह्या भारतीय अर्थवेवस्थेचा पाया आहे.गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. स्मॉलकॅप कंपन्या म्हणजे  त्या कंपन्या ज्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन ५०० कोटी ते २५०० कोटीच्या दरम्यान आहे. अश्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी Smallcap Mutual Funds हा एक पर्याय आहे. आज आपण असल्याचं बेस्ट ५ Smallcap Mutual Funds बद्दल माहिती घेणार आहोत. जे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात व गुंतवणूदारांना फायदा देतात.

Best 5 Smallcap Mutual Funds :

मे २०२४ च्या सदस्य कामगिरीवर आधारित रिपोर्ट नुसार Best 5 Smallcap Mutual Funds :

१) क्वांट स्मॉलकॅप फंड:(Quant Smallcap Fund)

क्वांट स्मॉलकॅप फंड हे भारतातील सर्वात जुना स्मॉलकॅप फंड पैकी एक आहे. ह्या फंड चे अनुभवी फंड मॅनेजर आशुतोष रस्तोगी यांच्या देखरेखी खाली हा फ़ंड दीर्घकालीन चांगली प्रगती करत आहे. हे फंड दिनांक २७ एप्रिल २००६ मध्ये लाँच करण्यात आले होते. ३० एप्रिल २०२४ च्या रिपोर्ट नुसार या फंडाचा AUM म्हणजे एसेट अंडर मॅनेजमेंट रुपये  ९,२२१ कोटी आहे. क्वांट स्मॉलकॅप फंडाचे ५ वर्षाचे सरासरी रिटर्न (CACR ) हे २४.२८% आहे. या कंपनीचे मॅनेजर कंपनीची वाढीची क्षमता आणि मजबूत वेवसाय मॉडेल असलेल्या स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर जास्त भर देतात. तुम्ही या फंडामध्ये किमान  १००० रुपया पासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकता.

2) बंधन स्मॉल कॅप फंड:(Bandhan Smallcap Fund)

बंधन स्मॉल कॅप फंड हा नवीन फ़ंड असून सुद्धा त्याने गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. हा फंड १२ जुलै २०१८ मध्ये लाँच करण्यात आला आहे. ह्या फंडाचे मॅनेजर हर्षित पाटील हे आकर्षक मूल्यांकनावर असलेल्या आणि मजबूत आर्थिक पाय असलेल्या स्मालकॅप कंपन्यावर लक्ष केंद्रित करतात. ३० एप्रिल २०२४ च्या रिपोर्ट नुसार या फंडाचा AUM म्हणजे एसेट अंडर मॅनेजमेंट रुपये ५,७१२  कोटी आहे. बंधन स्मॉल कॅप फंडचे ५ वर्षाचे सरासरी रिटर्न (CACR ) हे २७.५४% आहे. तुम्ही या फंडामध्ये किमान १०० रुपया पासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकता.

३) निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंड:(Nippon India Smallcap Fund)

निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंड ११ एप्रिल २०११ मध्ये लाँच करण्यात आला आहे. फंड मॅनेजर सौरभ जैन अंडरव्हॅल्यूड (Undervalued ) स्मॉलकॅप कंपन्या शोधण्यावर आणि त्यांचा दीर्घकालीन वाढीची क्षमता ओळखण्यावर भर देतात. ३० एप्रिल २०२४ च्या रिपोर्ट नुसार या फंडाचा AUM म्हणजे एसेट अंडर मॅनेजमेंट रुपये ८,१४५ कोटी आहे. निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंडाचे ५ वर्षाचे सरासरी रिटर्न (CACR ) हे २२.१२ आहे. तुम्ही निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंड मध्ये किमान १०० रुपया पासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकता.

४)SBI स्मॉलकॅप फंड:(SBI Smallcap Fund)

SBI स्मॉलकॅप फंड ११ एप्रिल २०११ मध्ये लाँच करण्यात आला आहे. हे भारतातील सर्वातमोठे स्मालकॅप फंड आहे. या फंडचे अनुभवी फंड मॅनेजर अमित राठी यांचे नेतृत्व आहे. फंड मॅनेजर चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या आणि मजबूत असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देतात.  ३० एप्रिल २०२४ च्या रिपोर्ट नुसार या फंडाचा AUM म्हणजे एसेट अंडर मॅनेजमेंट रुपये २२,२३६ कोटी आहे. SBI स्मॉलकॅप फंडचे ५ वर्षाचे सरासरी रिटर्न (CACR ) हे २१.७८ आहे. तुम्ही SBI स्मॉलकॅप फंड मध्ये किमान १००० रुपया पासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकता. 

५)फ्रेंकलिन इंडिया स्मॉलकॅप फंड:(Franklin Smallcap Fund) 

फ्रेंकलिन इंडिया स्मॉलकॅप फंड हा एक लोकप्रिय स्मॉलकॅप म्युच्युअल फंड आहे. जो १९ जुलै २००५ पासून बाजारात कार्यरत आहे. फ्रेंकलिन इंडिया स्मॉलकॅप फंड हे अनुभवी फंड मॅनेजर शेखर राधाकृष्ण यांच्या हाताखाली कार्यरत आहे.   ३० एप्रिल २०२४ च्या रिपोर्ट नुसार या फंडाचा AUM म्हणजे एसेट अंडर मॅनेजमेंट रुपये ७,८५२ कोटी आहे. SBI स्मॉलकॅप फंडचे ५ वर्षाचे सरासरी रिटर्न (CACR ) हे २३.१५% आहे. जो बेंचमार्कपेक्षा जास्त आहे. तज्ञांचा सल्ला नुसार हा फंड दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी चांगला पर्याय शु शकतो. तुम्ही या फंडामध्ये किमान  ५००० रुपया पासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकता.

स्मॉलकॅप फंड निवडण्यासाठी टिप्स:(Smallcap Mutual Funds Investment Tips)

वरील ५ फांद्यांवरून अंदाज लावू शकता कि मार्केटमध्ये अनेक प्रकारचे स्मालकॅप फंड आहेत. पण तुमच्यासाठी कोणते योग्य ठरू शकते हे बघणे महत्वाचे आहे. सर्वोत्तम फंड निवडण्यासाठी खालील घटकांचा विचार करणे आवश्यक आहे.

फंडचा ट्रॅक रेकॉर्ड:

फंडाची गेल्या ५ वर्षाची कामगिरी काय आहे? त्याने बेंचमार्क आणि इतर फंडच्या तुलनेत कशी कामगिरी केली आहे? हे नक्की बघा. दीर्घकालीन चांगली कामगिरी दर्शवणारे फंड निवडू शकता.

फंड  मॅनेजरचा अनुभव:

फंडाचे वेवस्थापन कोणत्या वेक्ती कडे आहे? फंड  मॅनेजरचा अनुभव आणि ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे? ह्या सर्वगोष्टीची माहिती काढा. त्यांची गुंतवणूक शैली तुमच्या सहन  शीलतेशी जुळते का? हे नक्की बघा.

फंडाचे गुंतवणुकीचे तत्वज्ञान:

फंड कोणत्या क्षेत्रात आणि स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो? ते value आणि growth आधारित गुंतवणूक करतात का? फंडची गुंतवणूक शैली तुमच्या ध्येहाशी सुसंगत आहे का याची खात्री करा.

फंडाचे फी आणि खर्च:

फंडाचे फी आणि दीर्घकालीन खर्च किती आहे? याची माहिती काढा. कारण कमी खर्च असलेले फंड दीर्घकाळात चांगले रिटर्न देऊ शकतात.

SIP द्वारे गुंतवणूक:

SIP द्वारे स्मालकॅप फंड मध्ये गुंतवणूक करणे कधीही फायदेशीर ठरू शकते.परंतु SIP द्वारे गुंतवणूक करताना काही महत्वाचं गोष्टी लक्ष्यात ठेवणे खूप महत्वाचे आहे. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आता आपण पाहूया.

  • तूमच्या गुंतवणुकीचे  ध्येय आणि जोखीम सहनशीलतेनुसार योग्य फंड निवडण्यासाठी आर्थिक नियोजकाचा सल्ला घेणे कधीही चांगले ठरेल.
  •  SIP सुरू करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा तुमच्या विश्वासू असलेल्या म्युचुअल फंड एजंटची मदत घेऊ शकता.
  • SIP मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला कधीही चांगलं परतावा देते. त्यामुळे SIP गुंतवणूक करताना तुम्ही दर महिन्याला किती रक्कम गुंतवणूक करणार आहात आणि किती काळ गुंतवणूक करणात आहात हे ठरवा.
  • ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरत असल्यास तुमचे बँक खाते SIP साठी लिंक करण्यासाठी E-mandate भरा.
  • तुमच्या निवडलेल्या फंडात SIP सुरू करा आणि तुमच्या गुंतवणुकीवर नजर ठेवा.

स्मॉलकॅप फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे:(Benefits Of Smallcap Mutual Funds)

उच्च परतावा: स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये जास्त वाढ होण्याची क्षमता असते, ज्यामुळे तुम्हाला स्मॉलकॅप फंडांमध्ये उच्च परतावा मिळू शकतो.

विविधीकरण: स्मॉलकॅप फंड तुमच्या गुंतवणुकीचे पोर्टफोलिओ विविध करण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमचे एकूण जोखीम कमीहोऊ शकते.

कमी स्पर्धा: लहान आकारामुळे, स्मॉलकॅप कंपन्यांना मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत स्पर्धा कमी असते.

स्मॉलकॅप फंडांमध्ये गुंतवणुकीचे तोटे:(Loss In Smallcap Mutual Funds)

उच्च जोखीम: स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये अधिक अस्थिरता असते आणि मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत त्यांचे जोखीम जास्त असते.

कमी लिक्विडीटी : स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर्स कमी लिक्विड असतात, म्हणजेच ते त्वरित खरेदी आणि विकणे कठीण असू शकते.

मर्यादित माहिती: लहान असल्यामुळे, स्मॉलकॅप कंपन्यांबद्दल मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी माहिती उपलब्ध असू शकते.

निष्कर्ष:(Conclusion)

स्मॉलकॅप फंड हे दीर्घकालीन सम्पत्तीसाठी चांगला पर्याय आहे.भारतात अनेक स्मालकॅप म्युच्युअल फंड आहे आहेत आपण योग्य रिसर्च करून आपल्यासाठी योग्य फंड निवडणे कधीही चांगले ठरत असते.परंतु स्मालकॅप फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांच्याशी संबंधित जोखींम बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.

(हा लेख फक्त माहितीच्या हेतूने आहे आणि कोणत्याही विशिष्ट गुंतवणूक सल्ला देत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमचा स्वतःचा संशोधन करणे आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

१)स्मॉल कॅप फंड म्हणजे काय?

 स्मॉलकॅप कंपन्या म्हणजे  त्या कंपन्या ज्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन ५०० कोटी ते २५०० कोटीच्या दरम्यान आहे. अश्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी Smallcap Mutual Funds हा एक पर्याय आहे. 

२)स्मॉलकॅप फंडात गुंतवणूक कशी करावी?

तुम्ही SIP द्वारे स्मालकॅप फंदात गुंतवणूक करू शकता. SIP द्वारे स्मालकॅप फंड मध्ये गुंतवणूक करणे कधीही फायदेशीर ठरू शकते.परंतु SIP द्वारे गुंतवणूक करताना काही महत्वाचं गोष्टी लक्ष्यात ठेवणे खूप महत्वाचे आहे.


३)भारतात स्मॉल कॅप स्टॉक्स काय आहेत?

भारतात स्मॉल कॅप स्टॉक्स  कंपन्या ज्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन ५०० कोटी ते २५०० कोटीच्या दरम्यान आहे. या कंपन्यांना लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योग (SMEs) म्हणून देखील ओळखले जाते.

४)स्मॉल कॅप स्टॉक कसे ओळखावे?

भारतात ₹500 कोटी ते ₹20,000 कोटी पर्यंत बाजारपेठेतील भांडवलासह कंपन्यांचे स्टॉक स्मॉल-कॅप स्टॉक्स मानले जातात. तुम्ही स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर किंवा मनीकंट्रोल सारख्या वित्तीय वेबसाइटवर कंपन्यांचे बाजारपेठेतील भांडवल पाहू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version