Bullion Market (सराफा बाजार): बुलियन मार्केट काय आहे?

Bullion Market

बुलियन मार्केट (Bullion Market) सोने, चांदी, प्लॅटिनम आणि पॅलेडियम यांसारख्या मौल्यवान धातूंचे व्यापार करतात. सोने, चांदी हे मौल्यवान धातू सर्वांनाच आकर्षित करतात. ते जास्तीत जास्त आपल्याकडे असावे असे सर्वानांच वाटते पण या मौल्यवान धातुंची किंमत खूप जास्त असते. आपण सर्व हा विचार करत असतो कि या धातूंची ची किंमत एवढी जास्त का आहे? आणि या धातूंची किंमत नेमके कोण ठरवत असते? चला तर मग आज आपण या बद्दल संपूर्ण माहिती बघुयात. सोनं आणि चांदी यांची किंमत ठरवण्यात मोठे योगदान असते ते म्हणजे बुलियन मार्केटचे. मग काय आहे हे बुलियन मार्केट? ये कसे काम करते? या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हला या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.

बुलियन मार्केट काय आहे?(what is Bullion Market?)

बुलियन मार्केट हे एक जागतिक मार्केट आहे जिथे सोनं, चांदी, प्लॅटिनम आणि पॅलेडियम इत्यादी मौल्यवान धातूंची खरेदी विक्री केली जाते. हे जगातील सर्वात मोठे मार्केट आहे. Bullion Marketयालाच मराठी मध्ये सराफा बाजार असे म्हणतात. हे मार्केट धातूंची भौतिक किंवा कागदी स्वरूपात खरेदी , विक्री आणि गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाचा मार्ग आहे. हे मार्केट २४ तास अंडी आठवड्यात ७ दिवस सुरु असते. भारतात प्रत्येक शहरात स्थानिक सराफा बाजार आढळतात . त्यांची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजता प्रयन्त असते. परंतु जगभरातील प्रमुख मार्केट २४ तास सुरु असते.

बुलियन मार्केट मध्ये कोणत्या गोष्टींचा व्यापार केला जातो? (What is traded in the bullion market?)

बुलियन  मार्केट म्हणजे सराफा बाजार मध्ये सोनं आणि चांदीच्या खालील गोष्टीचा व्यापार केला जात असतो.

  • सोनं आणि चांदीच्या तुकड्या म्हणजे बिस्कीट
  • सोन्याचे दागिने
  • सोनं आणि चांदीचे नाणी 
  • गोल्ड बॉण्ड 
  • गोल्ड म्युच्युअल फंड 
  • गोल्ड ईटीएफ 

(यांचा थेट व्यापार होत नाही, गुंतवणुकीचा पर्याय म्हणून उल्लेख केला आहे.)

बुलियन  मार्केटमधील प्रमुख गोष्टी: (Highlights of the Bullion Market)

सोने आणि चांदीची किंमत: बुलियन मार्केट मध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमवर दर्शवली जाते.२४ कॅरेट सोनं आणि २२ कॅरेट सोनं अशा वेगवेगळ्या शुद्धतेवर किंमत दर्शवली जाते. तर चांदीची किंमत प्रति किलो मध्ये दर्शवली जाते. या किंमतीत सतत बदल होत असतात. सोनं आणि चांदीची किंमत जागतिक बाजारपेठ , पुरवठा ,आणि मांगणी यावर अवलंबून असते.

हॉलमार्किंग: हॉलमार्क हे शोन्याची शुद्धता दर्शवते. भारत सरकारने सोन्याची शुद्धता दर्शवण्या साठी 

हॉलमार्किंग सक्ती केली आहे. बुलियन मार्केट मध्ये खरेदी करताना हॉलमार्क असलेलेच दागिने खरेदी करावे.

मेकिंग चार्जेस: सोन्याच्या दागिन्यांच्या किंमतीमध्ये सोन्याची शुद्धता आणि दागिन्यांची आकारणी करण्यासाठी लागणार खर्च यांचा समावेश असतो. मेकिंग चार्जेस हे दागिन्यांच्या डिझाइन आणि जडणावर अवलंबून असते.
GST : सोन्याच्या खरेदीवर ३% GST लागू आहे.

बुलियन  मार्केटमध्ये गुंतवणुकीचे फायदे: (Benefits of investing in Bullion Market)

आर्थिक लाभ: सोनं हे जगातील सर्वात मौल्यवान धातून पैकी के आहे. हे जागतिक थरावर मान्यताप्राप्त चलन आहे. आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक हे नेहमी फायदा करून देत असते.

दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती: दीर्घकालात सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता जात असते. त्यामुळे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी सोन्यात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

पोर्टपोलिओ विविधता: सोन्यासारख्या वेगळ्या asset class मध्ये इन्व्हेस्ट करून आपले पोर्टपोलिओ विविधता करता येते. यामुळे शेअर मार्केटमधील चढउतार कमी प्रमाणात होते.

बुलियन  मार्केट इन्व्हेस्टमेंट मध्ये लक्ष्यात ठेवायच्या गोष्टी: (Things to Aim for in Bullion Market Investment)

१) गुंतवणुकीचे ध्येय नेहमी स्पष्ट ठेवा: सोन्यात गुंतवणूक करताना आपले ध्येय नेहमी निश्चित करावे. आपल्याला दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे कि लग्नासारख्या त्वरित कार्यासाठी? पण सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक जास्त फायदा देत असते. दीर्घकालीन गुंतवणूक करायचे असल्यास सोन्याच्या दागिण्यापेक्षा सोन्याच्या नाणी , बिस्कीट , गोल्ड बॉण्ड्स चांगले पर्याय ठरू शकतात. कारण यामध्ये मेकिंग चार्जेस लागत नाही.

२)बजेट ठरवा: सोन्यात गुंतवणूक करताना तुम्ही सोन्यात किती गुंतवणूक करणार आहेत हे ठरवा. तुमच्या एकूण गुंतवणुकीचा एक छोटा भाग सोन्यात गुंतवलेले कधीही चांगले ठरेल.

३)वेगवेगळ्या पर्यायाची तुलना नक्की करा: सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. सोन्याचे दागिने , सोन्याचे नाणी , बिस्कीट , गोल्ड बॉण्ड्स , गोल्ड ईटीफ आणि म्युच्युअल फंड यांच्या फायद्या तोट्याची तुलना करून योग्य वाटेल ते पर्याय निवडा.

सोने खरेदी करण्यासाठी अतिरिक्त टिप्स:

Bullion Market

सोने खरेदी करताना बिल नक्की घ्या: सोने खरेदी करताना बिल नक्की घ्या त्या बिलावर सोन्याची शुद्धता ,वजन ,मेकिंग चार्जेस आणि  GST याची माहिती आहे की नाही हे नक्की तपासा.

सोन्याची शुद्धता तपासा: आपण घेतलेले सोनं हे शुद्ध आहे की नाही किंवा किती कॅरेट चे आहे हे नक्की तपासा. प्रत्येक शुद्ध सोन्यावर एक हॉलमार्क नंबर असतो त्या नंबर वरून आपण घेतलेलं सोनं हे किती कॅरेट चे आहे हे माहिती करून घेऊ शकतो. शुद्ध सोनं कसे तपासावे हे आपण या आधीच्या ब्लॉग मध्ये सांगितलेले आहे. अधिक माहित साठी तुम्ही तो ब्लॉग नक्की वाचा.

सोनं साठवण्याची वेवस्था करा: सोने हे खूप मौल्यवान दागिने आहे त्याची साठवण योग्य ठिकाणी करणे खूप गरजेचे आहे. सोनं तुम्ही बँकेच्या लॉकरमध्ये किंवा सरकार मान्य तिजोरी मध्ये ठेवू शकता.

सोन्याचा विमा: चोरी किंवा नुकसानीच्या प्रसंगी आर्थिक भरपाई म्हणून तुम्ही सोन्याचा विमा काढू शकता. ते फायदेशीर ठरू शकते.

बुलियन मार्केटच्या किंमतीवर परिणाम करणारे घटक:(Factors Affecting Bullion Market Price)

 जागतिक मांगणी आणि पुरवठा:

१)मांगणी: सोनं आणि चांदीची जागतिक मांगणी वाढल्यास त्यांच्या किंमती सुध्दा वाढतात. त्यात गुंतवणूक ,दागिने, औदयोगिक वापर इतर अनेक घटक जागतिक मागणीवर परिणाम करतात.

२)पुरवठा :सोनं आणि चांदीचा जागतिक पुरवठा कमी झाल्यास त्याच्या किंमतीत वाढ होते. खाणकाम,पूर्णप्राप्ती आणि इतर घटक जागतिक पुरवठ्यावर परिणाम करतात.

अमेरिकन डॉलर: सोनं आणि चांदीचा व्यापार अमेरिकन डॉलरने व्यापारात करतात. डॉलर मजबूत असल्यास सोनं चांदीची किंमत कमी होते. आणि डॉलर कमकुवत असल्यास सोनं व चांदीची किंमत वाढते.

व्याजदर: व्याजदर वाढल्यास सोनं आणि चांदी गुंतवणूकदारांसाठी कमी आकर्षित बनते. याचा परिणाम म्हणून  सोनं आणि चांदीची किंमत कमी ठरू शकते.

राजकीय आणि आर्थिक अस्थिरता: राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदारांसाठी  सोनं आणि चांदी सुरक्षित आश्रयस्थान मानले जातात. अश्या वेळेला सोनं आणि चांदीच्या किंमती वाढू शकतात.

महागाई: माहागाई वाढल्यास सोनं आणि चांदीच्या किंमती वाढत असतात.कारण सोनं आणि चांदी हे माहागाई पासून बचाव करण्याच एक साधन मानल्या जात.

शेअर मार्केटमधील चढउतार: शेअर मार्केटमधील चढउतारचा सोनं आणि चांदीच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो .शेअर मार्केट मध्ये घसरण झाल्यास गुंतवणूकदार सोनं आणि चंडीकडे वळू शकतात. त्यामुळे सोनं व चांदीच्या किमती वाढू शकतात.

सेंट्रल बँकांचे धोरणे: जगातील प्रमुख सेंट्रल बँक सोनं आणि चांदीची खरेदी विक्री करतात. त्यांच्या धोरणांचा सोनं आणि चांदीच्या किंमतीवर मोठा परिणाम होत असतो.

मीडिया आणि अफवा: सोनं आणि चांदीच्या किंमतीवर मीडिया आणि अफवांचा सुध्दा परिणाम होत असतो.

Bullion Market
निष्कर्ष:

बुलियन मार्केट (सराफा बाजार) हा सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा पर्याय मार्ग आहे. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केटच्या संपूर्ण अभ्यास करणे आणि सोन्याची योग्य प्रकारे साठवण करणे आवश्यक आहे . सोनं आणि चांदी यांच्या किंमतीवर अनेक घटक परिणाम करतात. त्यामुळे गुंतवणूक करताना सर्व गोष्टी चा अभ्यास करणे आवश्यक आहे.

(हा ब्लोग केवळ माहितीचा उद्देशाने आहे याला कुठलाही आर्थिक सल्ला मानला जाऊ नये . गुंतवणूक करताना सल्लागारचा सल्ला नक्की घ्या.)

नेहमी विचारले जाणारे प्रश्न:

1)शुद्ध सोनं कसे ओळखावे?

gold

शुद्ध सोनं हे २४ कॅरेट ,२२ कॅरेट ,२१ कॅरेट, १८ कॅरेट, १४ कॅरेट मध्ये उपलब्ध असते. आणि प्रत्येक कॅरेट साठी एक हॉलमार्के नंबर असतो. ते बघून तुम्ही शुद्ध सोनं ओळखू शकता. जेवडे जास्त कॅरेट असेल ते सोनं सर्वात चांगलं.

2)कोणते कॅरेट सोनं सर्वात उत्तम आहे?

२४ कॅरेट सोनं सर्वात उत्तम आहे. यात ९९.९९% सोनं असत.

3)२४ कॅरेट सोनं कसे ओळखावे?

Gold

तुम्ही हॉलमार्के नंबर बघून २४ कॅरेट सोनं तपासू शकता. २४ कॅरेट सोन्यावर ९९९ असा नंबर लिहलेला असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *